जत,संकेत टाइम्स : रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.रस्त्याला आवश्यक असणाऱ्या मुरूम,दगड यासाठी जत तालुक्यातील बेवणूर गावच्या पश्विमेला डी.बी.एल.या कंपनीने मोठी खोलवर खुदाई केली आहे.ब्लोअर ब्लास्टच्या वापराने खुदाई करताना परिसरातील घरांना भेगा व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याची नुकसान भरपाई मिळावी व कंपनीवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली.
मात्र काहीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधार्थ जत तालुका संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षनिक उपोषण करण्यात आले.
उपोषणाचे निवेदन स्वीकारन्यास एकही अधिकारी न आल्याने उपोषकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला.दरम्यान मागण्यांची पूर्तता झाली नाही तरी शेतकरी ,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषकर्त्यांनी दिला आहे.
उपोषणाला युवा नेते नाथा पाटील,माणिक वाघमोडे आदींसह २९ लोकांनी पाठींबा दिला.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक,तालुकाध्यक्ष दीपक पाटणकर,शहराध्यक्ष प्रमोद काटे,इर्शाद तांबोळी तर बेवणूर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईक,बापू शिंदे,संदीप शिंदे,तानाजी शिंदे,ओंकार शिंदे आदींनी लाक्षानिक उपोषणास सहभाग घेतला.