जत तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

0
3
जत,संकेत टाइम्स : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज (ता.११) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. दरम्यान, तालुक्यात शहरी भागात बंदला प्रतिसाद मिळाला, ग्रामीण भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

महाविकास आघाडीने आवाहन केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील नसेल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, कमीप्रमाणात प्रवासी बस स्थानकावर आले आहेत. तसेच राज्यात काही भागात बंदला हिंसक वळण मिळून बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आगारातून बस सोडण्याचे प्रमाण अल्प आहे.
दरम्यान, शहरात महाविकास आघाडीने जत मार्केट कमिटी येथून विजापूर-गुहागर रस्ता मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यात कॉंग्रेसकडून तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,अँड.चन्नाप्पा होर्तीकर,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,नगरसेवक भूपेंद्र कांबळे, शिवसेनेचे बंटी दुधाळ यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोर्चा काढला

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here