भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी जागा देण्याचे लेखी आश्वासन

0

 

माडग्याळ,संकेत टाइम्स : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानासाठी तातडीने जागा द्यावी,या मागणीसाठी ऑल इंडिया पँथरच्या वतीने ग्रामपंचायती समोर लाक्षणिक उपोषण केले.माडग्याळ येथे उद्यानासाठी जागा द्यावी,अशी मागणी गेल्या आठ महिन्यापुर्वी पँथरच्या वतीने करण्यात आली होती.सातत्याने ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही जागा मिळालेली नाही.ग्रामपंचायतीने जागा देण्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी,फक्त देतो,देऊया अशी थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेहत आहेत.त्यांमुळे हे आंदोलन केले असल्याचे नागेश ऐवळे,व विक्री वाघमारे यांनी सांगितले.

Rate Card

आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,स्व.राजारामबापू पाटील फोंडेशनचे अध्यक्ष संतोष बोगार,मारुतीराव कोरे, परशुराम बंडगर,प्रवीण सावंत यांनी पांठिबा दिला.पांडुरंग निकम, हणमंत नाटेकर, राजकुमार ऐवाळे,मारुती नाटेकर, दशरथ सावंत,दत्ता सावंत,किशोर कांबळे, अस्लम शेख,लकडेवाडी गावचे सरपंच एकनाथ बंडगर,ऑल इंडिया पॅन्थरचे गिरीष सर्जे, अंगद ऐवाळे, शामभाऊ परीट, सिद्धार्थ नाटेकर, दीपक वाघमारे, विकास हुवाळे, आंबू कांबळे, नजीर शेख, सुरेश हाके, येसाप्पा बंडगर, विजय कांबळे, लोकेश कांबळे, सागर ऐवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान लवकरचं जागा उपलब्ध करून देण्याची लेख पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने संरपच अप्पू जत्ती यांनी आंदोलकांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

माडग्याळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानासाठी जागा द्यावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.