जत
संकेत टाइम्स
जत तालुक्यातील सर्व ओबीसी व व्हीजेएनटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मार्गदर्शनपर बैठक संपन्न झाली.महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.अध्यक्षस्थानी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे सांगली जिल्हा समन्वयक सुनिल गुरव होते.
सुनिल गुरव म्हणाले की,जत विधानसभा मतदारसंघात ओबीसी आणि व्हीजेएनटी या वर्गातील कार्यकर्त्यांची जनजागृती चांगल्या प्रकारे समाधानकार करीत्या झालेली आहे त्याचबरोबर राजकीय आरक्षण शैक्षणिक,आरक्षण नोकरीतील आरक्षण अशा आपल्या हक्कासाठी केव्हा ही रस्त्यावर उतरण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करत,स्वतःच्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे श्री.गुरव म्हणाले.
प्रास्ताविक दिनकर पतंगे तर स्वागत शिवाजीराव शेंडगे केले.गौतम शिंगे,तुकाराम माळी,तायाप्पा वाघमोडे,अँड.हिप्परकर सर,श्री.पांढरे सर,श्री.बंडगर सर,राजेंद्र आरळी यांची मनोगते व्यक्त केली.यावेळी जत तालुक्यातील ओबीसी व व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र शाखा जत येथील पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.
दिनकर पतंगे जिल्हा कार्यकारणी वरती समन्वयक, रवी सोलंकर तालुका मुख्य समन्वयक,राजेंद्र आरळी समन्वयक, तुकाराम माळी मुख्य निमंत्रक,तायाप्पा वाघमोडे पूरक निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली, तसेच हाजी हुजरे,गुंडा मुंजे,आनंद पांढरे, श्रीकांत माळी,दीपक वनारसे,चंद्रकांत बंडगर यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सर्वांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. इथून पुढे जत तालुक्यात ओबीसीचे संघटन मोठ्या ताकतीने,जोमाने आणि एकजुटीने करण्याचा निर्धार करण्यात आला.रवी सोलंकर यांनी आभार मानले.




