आटपाडी येथील ऊसतोड कोयता मेळाव्यास कामगार,मुकादम,वाहतुकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे | सचिन मदने यांचे आवाहन

0
88
आटपाडी
संकेत टाइम्स वृत्तसेवा

आटपाडी येथे दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी ऊसतोड वाहतूकदार आणि मुकदम व कामगार यांचा महाराष्ट्र जनविकास ऊसतोड कामगार सरचिटणीस हरिदास लेंगरे यांच्या उपस्थितीत ऊसतोड, वाहतूकदार, मुकादम,व कामगारांच्या  विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व न्याय हक्कासाठी आटपाडी येथे भव्य मेळाव्याचे आयोजिन करण्यात आले आहे.या मेळाव्यास जत तालुक्यातील ऊसतोड कामगार,वाहतूकदार व  मुकादमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन युवा सेना जत तालुका प्रमुख सचिन मदने यांनी केले आहे.

 

 

 

 

 

महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र जनविकास कामगार युनिट महाराष्ट्र राज्य संस्थापक सरचिटणीस हरिदास लेंगरे ज्याप्रकारे हमाल,माथाडी, बांधकाम कामगार,पेट्रोल पंप कामगार,गॅस कामगार आशा कामगारांच्या घटकांसाठी भरीव उल्लेखनीय काम लेंगरे करत आहेत.

 

 

 

 

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना दोन वर्षांपूर्वी वाचा फोडून ऊसतोड दरवाढीचा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय हक्कासाठी अन्याय करणार्‍यांचे कंबरडे मोडण्यासाठी जत तालुक्यातील सर्व ऊसतोड वाहतूकदार मुकादम कामगारांसह मोठ्या संख्येने आटपाडी येथील मेळाव्यास उपस्थित राहावे,असे आवाहन श्री. मदने यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here