पांडोझरीतील ‘आमदार आपल्या दारी’ मेळाव्यात अनेक शासकीय प्रकरणाचा निपटारा

0
दरिबडची
संकेत टाइम्स वृत्तसेवा

 

पांडोझरी (ता. जत) येथे मंडळ विभागात गुरुवार, दि. १४ रोजी महाराजस्व अभियानांतर्गत ‘आमदार आपल्या दारी, उपक्रम राबविण्यात आला.नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे घालायला लागू नयेत यासाठी शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘आमदार आपल्या दारी’ योजनेंतर्गत शासनाच्या एकूण ९ विभागांमार्फत नागरिकांची विविध कामे त्याच ठिकाणी करण्यात आली. या योजनेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,तहसीलदार बनसोडे,अनेक गावचे संरपच,उपसंरपच व सर्व विभागाचे‌ अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

या अभियानात महसूल व इतर विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्यात आले. त्यामध्ये जातीचा दाखला, आदिवासी दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलिअर, शेतकरी दाखला, सात-बारा व ८ अ फेरफार, आधारकार्ड, पॅनकार्ड, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना अपंग पेन्शन योजना, दुबार रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, मतदार नोंदणी, अन्नसुरक्षा योजना राबविण्यात आल्या. या दाखल्यांचे मेळाव्यात वाटप करण्यात आले.

 

 

 

 

या उपक्रमात शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली त्याबद्दल त्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन. भविष्यात असे लोक उपयोगी उपक्रम अजून राबविण्याचा आमचा मानस आहे. जनसामान्यांना केंद्रबिंदु म्हणून आम्ही नेहमीच काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू,असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.

 

 

अशानेतर मुर्दाड अधिकारी सुधारतील काय?
जत तालुक्यातील शासकीय कार्यालये लुटीचे अड्डे बनले आहेत.जतच्या तहसील कार्यालया अतर्गंत येणाऱ्या प्रत्येक विभागात वजन ठेवल्याशिवाय कागद हालत नाही,असे सातत्याने आरोप होत आहेत.भूमीअभिलेख,दुय्यम निंबधक, पुरवठा,रेकार्ड,गौण खनिज,जमिन नोंदीसाठी दलालचा आसरा घ्यावा लागत आहे हे जगजाहीर आहे.आमदार विक्रमसिंह सांवत यांनी आमदार आपल्या दारी हा स्तुत उपक्रम राबविला आहे.मात्र यानंतरतर अधिकारी सुधारतील काय याबाबत साशंकता आहे.

 

 

मेळावा सार्थकी लागावा
तीन वर्षापुर्वी डफळापूर येथे झालेल्या मेळाव्यात तेथील नागरिकांनी कागदपत्रे देऊनही तीन वर्षानंतरही त्यांना रेशनकार्ड मिळाली नाहीत.पुरवठा विभागाचे दलाल कर्मचारी,अधिकारी वजन न ठेवल्यामुळे नागरिकांना तुमची कागदपत्रे हरविली आहेत.कागदपत्रे अपुरे आहेत.अशी कारणे देऊन हेलपाटे मारायला सांगत आहेत.आतातरी त्यात सुधारणा व्हावी,पांडोझरीतील मेळाव्यात आलेल्या प्रत्येक कागदपत्राचा निपटारा व्हावा.कमी कागदपत्रे,अपुरी माहितीची प्रकरणाचा अधिकाऱ्यांनी गांभिर्यांने लक्ष घालून निपटरा करावा,हे अपेक्षित आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.