जत : जत तालुक्यातील पाच्छापूर येथील तम्माण्णा भीम्माण्णा माळी यांनी कसत असलेल्या शेतातील वस्तीवर लांडग्यांच्या हल्ल्यात फस्त केल्या.
पाच्छापूर येथील पठाण मळ्याजवळ राहुल जाधव यांच्या शेतात तम्माण्णा भीम्माण्णा माळी हे शेती कसत आहेत.
काल सायंकाळी माळी हे गावात गेले होते तर त्यांच्या पत्नी शेतात गवत काढण्यासाठी गेले असता लांडग्यांच्या कळपाने अचानक हल्ला करून घरासमोर बांधलेल्या दोन गाभण असलेल्या शेळ्या खाऊन फस्त केल्या.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यात माळी यांचे ३० हजाराचे नुकसान झाले आहे.




