येळवीतील सागर गंगणेच्या कुंटुबियांना उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनकडून मदतीचा हात

0
10
जत,संकेत‌ टाइम्स : जत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाज्यातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे मुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी “एक हात मदतीचा”हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून गंगणे परिवाराला रोख स्वरूपात मदत देण्यात आली.

 

 

जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि त्यांच्या पत्नी संस्थेचे चेअरमन सौ.डॉ.वैशाली सनमडीकर यांनी करून काकांच्या स्मरणार्थ श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत,च्या वतीने, ‘सामाजिक कृतज्ञता निधी ‘ म्हणून रोखरक्कम देण्याची सुरुवात करण्यात आली. आहे.दि.१६ ऑक्टोंबर २०२१ ला येळवी येथील स्व.सागर दादासो गंगणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.कुटुंबातील कर्त्या तरुणाचा मृर्त्यू झाल्यामुळे त्यांच्या कुंटुबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

त्यांच्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ म्हणून त्यांच्या कुंटुबियांना रोख स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी येळवीचे सरपंच कुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी,शशिकांत गानमोटे,सुशांत लांडगे त्यांचे कुटूंबीय व संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापक श्री.पवार सर,श्री.जगधने सर, सहशिक्षक श्री.पाटील सर हे उपस्थित होते. भविष्यातही अशा आकस्मिक घटनाना  उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हातम्त येणार असल्याची माहिती, डॉ.कैलास सनमडीकर आणि डॉ.सौ. वैशाली सनमडीकर यांनी दिली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here