जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील विविध मागण्यासाठी रिपाईकडून रास्ता रोको करण्यात आला.शहरातील महाराणा प्रताप चौक येथे तब्बल तासभर आंदोलकांनी वाहने रोकून धरली होती.संभाजी चौक ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता दुरुस्ती, डॉ.आरळी दवाखाना ते संभाजी चौक रस्ता,जत हायस्कूल ते घाडगेवाडी रस्त्यालगत असणारे ओढा पत्रात अतिक्रमण करून प्लॉटिंग करून अनधिकृतपणे चालू असलेली शासकीय जागेची विक्री करत आहेत,ती थांबवावी.

जत,उमदी,संख तसेच तालुक्यातील इतर गावातून मटका जुगार, खाजगी सावकारी बेकायदेशीर गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू आहे,ते बंद करावेत.नॅशनल हायवेचे काम निकृष्ट पद्धतीची केल्यामुळे दोन महिन्यातच खड्डे पडलेले आहेत.
उपविभागीय अधिकारी जत मधील लिपिक सुनिल कवठेकर हे जातीचे दाखल्यासाठी पैशाची मागणी करून त्रास देतात व उध्दट वर्तन करतात,त्यांची बदली करावी,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,उपाध्यक्ष विकास साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील,युवा जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत चौगुले,जेष्ठ नेते शंकर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्यातील विविध मागण्यासाठी रिपाइंचा रास्तारोको करण्यात आला.




