एकरकमी एफआरपीबाबत साखर आयुक्तांनी बोलावलेली बैठक निष्फळ | आंदोलन तीव्र करण्याचा महेश खराडे यांचा इशारा..

0
सांगली : सांगली सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेे एकरकमी एफआर पी च्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे.या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर संकुल पुणे येथे बैठक आयोजित केली होती. मात्र एकरकमी एफआरपीबाबत कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

 

दुसरीकडे साखर कारखानदारही या बैठकीला आले नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.दरम्यान एफ आर पी न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला.

 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात एक रकमी एफ आर पी साठी आंदोलनाचा धूम धडाका उठविला आहे. एक रकमी एफ आर पी मिळावी या मागणीसाठी दोनदा साखर कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढण्यात आली.त्यानंतर तासगाव, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात ट्रॅक्टर पंक्टर करणे,हवा सोडणे, ऊस तोड थांबविणे आणि ट्रॅक्टर पेठविने आदी आंदोलने सुरू आहेत.

 

 

याशिवाय सातारा जिल्ह्यातही अशीच आंदोलने संघटनेकडून सुरू आहेत.त्याबाबत काहीतरी आजच्या बैठकीत ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा या बैठकीवेळी संघटनेच्या कार्यकर्त्याना होती मात्र कारखानदारांनी या बैठकिकडे पाठ फिरवल्याने काहीही तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे.

 

 

 

साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे हीत पहायचे नसेल तर होणाऱ्या नुकसानीला स्वाभिमानी जबाबदार राहणार नाही ,असा इशारा ही संघटनेने दिला आहे. दरम्यान या बैठकीत साखर उतारा चोरी, वजन काटामारी आणि तोडणीसाठी द्यावे लागणारे पैसे याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना धारेवर धरले.  या बैठकीवेळी तासगाव, नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत बिलाबाबत गरमागरम चर्चा झाली.

 

 

तसेच डोंगराईच्या केन ऍग्रो, कारखान्याच्या थकीत बिलाचाही प्रश्न लावून धरला.वसंतदादा साखर कारखान्याच्या 13 – 14 च्या गाळप हंगामातील थकीत बिले, तसेच राजारामबापू, हुतात्मा आटपाडीचा मानगंगा कारखाण्याच्या थकीत बिलाचा विषयही महेश खराडे यांनी उचलून धरला.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, राज्यप्रवक्ते अनिल पवार, भागवत जाधव, पोपट मोरे, राजु शेळके,एस्. यु .संन्दे, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, भैरवनाथ कदम,बाळासाहेब जाधव,दत्तात्रय घारगे, आनंद जगम सह अन्य संघटनेचे पद्धाधिकारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.