डफळापूर : जत पश्चिम भागातील रस्त्यांची वाताहात झाली आहे.अनेक रस्ते खड्डेयुक्त झाले आहेत.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बल्लारी,काटेरी वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.सर्वच रस्त्यावर खड्डे निश्चित आहेत.त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते.परंतु आजपर्यंत रस्त्याची डागडुजी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत. रस्त्यावर बापदादाची जाईदाद असल्यासारखे अनेकांनी कुठेही खोदकाम केले आहे.थेट चांगला रास्ता फोडून पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आता धोकादायक खड्डे पडल्यामुळे अपघात प्रणव क्षेत्रे बनली आहेत.
प्रत्येक रस्त्यावर अशा नियमबाह्य पाच ते दहा पाईपलाईन खोदण़्यात आल्या आहेत.संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने रस्ते फोडून नव्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.थेट रस्ता खोदून चर पाडली जाते.जवळपास दोन रुंद व सुमारे सहा फुटापर्यत खोल चर काढण्यात येते. त्यावर तेथेच काढलेला टाकलेला भराव काही दिवसांनी दबला जातो.काही दिवसात तेथे नव्याने मोठा खड्डा पडत आहे.या खड्यामुळे वाहनाची गती मंदावते.त्याशिवाय खड्ड्यात आदळून वाहनाचे नुकसान होत आहे.या खड्ड्यात पडून दुचाकीचे अपघात नित्याचे बनले आहेत.