जत : सिंहगड इन्स्टिट्यूट कुसगाव बु |लोणावळा येथे स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) द्वारा आयोजित नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स २०२१ च्या समारोप प्रसंगी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अरविंद नातू, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे,चेतनभाई पटेल फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम म्हाशाळे,बाळासाहेब वाघ, सौ.हेमा शिंदे (वाघ) आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२१ या दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर, हरियाणा, कर्नाटकासह भारताच्या विविध भागांतून शिक्षक तसेच शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या विविध NGO संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराणी (ता.जत) येथील प्राथमिक विषय शिक्षक धरेप्पा कट्टीमनी यांना ‘नॅशनल टीचर्स इनोव्हेशन अवार्ड २०२१’ देवून गौरविण्यात आले.
श्री.कट्टीमनी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे उपस्थिती वाढविणेबाबत विविध उपक्रम या विषयावर आधारित नवोपक्रम या स्पर्धेसाठी सादर केला होता. त्याची निवड झाली होती. त्यांना या कॉन्फरन्समध्ये सादरीरणासाठी बोलावण्यात येवून पुरस्कृत करण्यात आले.
या कॉन्फरन्स मध्ये विद्यार्थी, शाळा व समाज यांच्या प्रगतीसाठी आणखी काय करता येवू शकेल ? या बाबत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ ह.ना.जगताप, SCERT पुणेचे उपसंचालक विकास गरड साहेब, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ अरविंद नातू , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, हनी बी नेटवर्क गुजरातचे चेतनभाई पटेल व कोरोनामुळे बंद पडलेल्या शिक्षण क्षेत्रासमोर क्लिक ग्यान ने सुरु केलेलं नवे दालन आदीनी यावर विचारमंथन केले.
शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने आहेत आणि त्यावर कशाप्रकारे मात करून शिक्षण क्षेत्राला नवी उभारी देता येईल यावर विविध शिक्षण तज्ज्ञांनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध NGO संस्थांचे प्रतिनिधी यांनी आपले मत व्यक्त केले. सदर कॉन्फरन्सचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी राजकिरण चव्हाण, सौ.अनघा जहागीरदार व सर्व जिल्हा व तालुका समन्वयक यांनी सहकार्य केले.
श्री.धरेप्पा कट्टीमनी यांना नॅशनल टीचर्स इनोव्हेशन अवार्ड २०२१ प्रदान करण्यात आला.