जत,संकेत टाइम्स : कोरोनाचा प्रभाव कमी होताच जत तालुक्यात अवैध मटका,अवैध दारु,सिंदीचे गुत्ते,जुगार अड्डे बहरले आहेत.जत पोलीस ठाण्यातील नवीन अधिकाऱ्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले असून मोठा हप्ता घेऊन या अवैध धंद्याला किंबहुना कोरोना वाढीला पोलीस बळ देत आहेत.अवैध धंद्याचा उत्तम कारभार लाखोची कमाई करणार बनला असून तब्बल चार वसूली कलेक्टर नेमल्याची चर्चा सुरू आहे.
जत तालुक्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना मृगजळ असतेच झालेही तसेच जत पोलीस ठाण्याला नव्याने लाभलेल्या अधिकाऱ्यांने पदभार घेताच अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान काढले होते.त्या काळात त्यांच्या अनेक दिवस ठिय्या मांडलेल्या कर्मचाऱ्यांनी जड अंतकरणाने अवैध धंदे बंद करण्याचे धंदे चालकांना इमान इतबारे आदेश दिले.त्यामुळे त्यावेळी उघड्यावरील धंदे पडद्याआड सुरू झाले.
यात कर्मचाऱ्यांची कमाई सुरू होतीच,मात्र अधिकाऱ्यांना हिस्सा बुडत होता.मात्र सर्वकाही कळाल्यानंतर अखेर ठाण्यातून मटका,जूगार,दारू अड्ड्यांना परवाना मिळाल्याची चर्चा असून महिन्याचा हप्ता दुप्पट झाला आहे.नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर अधिकाऱ्यांने आपले रंग दाखविले असून पुन्हा नवे वसूली कलेक्टर नेमत वसूली मोहिम चालु केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
या वसूलीचे उत्तम उदाहरण वाहतूक पोलीस ठरले आहेत.दररोज परराज्य, राज्यातील गाड्या अडवित दररोज अनेक हाजारोची कमाई दिवसाढवळ्या सुरू आहे. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट पांठिबा मिळाला आहे.