माडग्याळ,संकेत टाइम्स : कुलाळवाडी ता.जत येथे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी भेट देत पाणी फाऊंडेशन कामाची पाहणी केली.
कुलाळवाडी येथे राबविले जात असलेले सामाजिक, शैक्षणिक, आणि नैसर्गिक समृध्दीचा कुलाळवाडी पॅटर्न जाणून घेतला.
यावेळी जिल्हा अधिकारी डॉ.अभिजित चौधरी,प्रांताधिकारी जोगेंद्र कट्टारे,जतचे तहसिलदार जीवन बनसोडे,संखचे अपर तहसीलदार एस.आर.मागाडे,स्थानिक पदाधिकारी, नागरिक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी डॉ.अभिजित चौधरी म्हणाले की,कुलाळवाडी गावात मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या जलसंधारणाचे काम चांगले झाले आहे.ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतल्याने गावात मोठा कायापालट झाला आहे. जिल्ह्यात अन्य गावांना आदर्श ठरेल असा उपक्रम राबविल्याचेही जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले.
कुलाळवाडीप्रमाणे इतर गावात देखील लोकसहभागातून अशा प्रकारच्या उपक्रम राबवत आपआपली गावे समृध्द करावीत.सीड बॉल,विद्यार्थ्यां मधील विकसित असलेली स्वयंपाक बनवण्याची कौशले यांच देखील डॉ.चौधरी यांनी कौतुक केले.
कुळालवाडी ता.जत येथे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट देत पाणी फांऊडेशनच्या कामाची पाहणी केली.