जत तालुक्यातील दत्त मंदिरांत भक्तीचा जागर

0
जत : भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या जत तालुक्यातील श्री.दत्त जयंती उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली आहे.दत्त दर्शनासाठी गावगावातील मंदिरात भक्तांचा महापूर आला आहे.दत्त जंयती निमित्त तालुकाभर भक्तीचा जागर फुलला होता.अनेक गावातील दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
मंदिराच्या गाभाऱ्याचे दार पहाटे तीन वाजता उघडल्यानंतर चार वाजता श्री दत्त महाराजांची पहाटेची काकडआरती झाली. यावेळी पहाटेपासूनच भक्तांनी दत्त मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.धार्मिक विधी,भजन,किर्तन,महाप्रसाद असे दिवसभर दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रमही संपन्न झाले.

 

जत,धावडवाडी,डफळापूर,माडग्याळ आदी गावात श्री. दत्त जंयतीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.धार्मिक विधी,महाप्रसाद व भाविकांच्या उपस्थितीने मंदिरे फूलून गेली होती.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.