आवंढी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण कोडग, व्हा.चेअरमनपदी सुमन सोळगे  

0
4
आवंढी,संकेत टाइम्स : आवंढी (ता.जत) सर्व सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक झाली.यामध्ये राष्ट्रवादीने 13 च्या 13 जागावर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे.पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच सोसायटीत सत्तेत बदल झाला आहे. बुधवारी नुतन निवडून आलेल्या संचालकांची मिटिंग पार पडली त्यामध्ये चेअरमनपदी लक्ष्मण कोडग तर व व्हा.चेअरमनपदी सुमन सोळगे यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी सचिव विजय तोरडमल निवडीचे पत्र दिले.नवे पदाधिकारी व सर्व नूतन संचालकांचा फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

 

यावेळी चेअरमन लक्ष्मण कोडग म्हणाले,गावात सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात येईल.कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना सभासद त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी पीककर्ज देणार आहोत.आपली सोसायटी ही सध्या ड वर्गात आहे,तरी थकीत कर्जदारांची वसूल करून त्यांना रेग्युलर करून घेऊ,सोसायटीही अ वर्गामध्ये आणण्याचा प्रयत्न राहिल.

निवडी नंतर आभार सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे ओ एस डी अमोल डफळे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सा.जि.म. बँकेचे संचालक मन्सूर खतीब, मच्छिंन्द्र वाघामोडे,  श्रीराम ज्वेलर्सचे मालक दुर्योधन कोडग, सावकर उद्योग समुहाचे मालक सुशांत कोडग, सुभाष गोब्बी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रांरभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
माजी सभापती सुरेश शिंदे म्हणाले की,आम्ही जाहीर सभेत दिलेला शब्द शेतकऱ्यांनी पाळला आहे.यापुढे सोसायटी सक्षम करूचं,त्याशिवाय प्रत्येक शेतकरी सुखी होईल.जिल्हा बॅकेचे दोन संचालक आपले आहेत.त्यामुळे सोसायटीच्या कोणत्याही अडचणी असो,त्या तत्परतेने सोडवू.तालुक्यात आदर्श ठरेल अशी सोसायटी आंवढीतील शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण करण्याचे आश्वासन दिले.

 

सुशांत कोडग म्हणाले,सोसायटी म्हणजे ही शेतकऱ्यांची मिनी बँक आहे. त्यामुळे प्रत्येक गरजवंत शेकऱ्यांनी सोसायटी च्या माध्यमातून पीककर्ज देऊन त्यांना आर्थिक हातभार लावावा.शेतकऱ्यांनी शेती सुधारित पद्धतीने करून शेतीच्या माध्यमातून आपला विकास केला  पाहिजे.

 

अमोल डफळे म्हणाले की,सरपंच आण्णासाहेब कोडग यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ मोठी आहे.त्यांना आंवढीतील शेतकऱ्यांनी मोठा पांठिबा दिला आहे.शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.जलसंपदा मंत्री जंयतराव पाटील यांच्या माध्यमातून आंवढीचा सर्वांगीण विकास करू,आंवढीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल,सिंचनासाठी पाणी,सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक हातभार यामुळे आंवढीतील परिस्थिती बदललेली दिसेल.

 

तालुकाध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की, आंवढीतील जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास ठेवून सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे.आंवढीतील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आम्ही कठिबंध्द आहोत.

 

जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब  म्हणाले,मला सहकार क्षेत्रातील पूर्ण अभ्यास आहे.त्यामुळे सोसायटीच्या सर्व समस्या सोडवू,सोसायटीची शंभर टक्के जर वसुली झाली तर नाबार्ड योजेनेतून तालुक्यातून पहिल्यांदा तुमच्या सोसायटीला 5 कोटी रुपये मी बँकेच्या माध्यमातून देतो,असे आश्वासन दिले.
डॉ.अण्णासाहेब कोडग यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी गावातील शेतकरी, आजी माजी सैनिक व महिला/भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here