तीन महिन्यात साडेनऊ कोटीचे कर्जवाटप ; प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांची माहिती | थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरू केला 

0
3
जत : सोसायटीत थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुरू केला असून तीन महिन्यात जत तालुक्यातील शेतकऱ्यांना साडेनऊ कोटींचे कर्ज वाटप केले असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

जिल्हा बँकेचे संचालक झाल्यापासून मागील तीन महिन्यात केलेल्या कामाचा आढावा संचालक जमदाडे व खतीब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडला.
जमदाडे,खतीब पुढे म्हणाले,मागील पाच वर्षात जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करताना आमदार सावंत यांनी जत तालुक्याच्या हिताची भूमिका न घेता शेतकऱ्यांची विरोधात भूमिका घेतली. सोसायटीची वसुली ८० टक्के आहे त्यांचा कर्जपुरवठा करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा बंद झाला. आम्ही दोघांनीही जिल्हा बँकेच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय मागे घ्यायला लावला.

 

 

जमदाडे व खतीब म्हणाले,
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन संचालक, जतचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निवडणुकीपूर्वी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा बँकेतून आठ लाख १५ हजाराचे कर्ज उचलले आहे. आ. सावंत हे स्वतः थकबाकीदार असताना त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली व जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

 

 

मंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील, सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण बाजूला ठेवून शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचे सांगून संचालक जमदाडे व खतीब म्हणाले तालुक्यातील सोसायटी दुरुस्ती, सोसायटी इमारत बांधकाम, शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा, द्राक्ष बाग उभारणी, वाहन कर्ज, घरबांधणी, लोन अगेन्स प्रॉपर्टी, जनावरांचा गोठा बांधणी इतकेच नव्हे तर शेतजमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. नोकरदारांना कर्ज देण्याबरोबरच बचत गट सक्षम करण्यासाठी प्रामुख्याने कर्ज पुरवठा केल्याचे सांगितले.

 

येणाऱ्या काळात  महिला व युवा उद्योजक यांना मोठया प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा बँक विविध आर्थिक महामंडळाची कर्ज प्रकरणे मंजूर करत नव्हती त्यामुळे युवा उद्योजकांना राष्ट्रीय बँकेकडे हेलपाटे मारावे लागत होते पण आता महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा केला जात आहे. महिला बचत गटांना भरीव कर्ज देण्याबरोबच तालुक्यात महिलासाठी उद्योग उभारणे,  युवा उद्योजकांना कर्ज पुरवठा करणे तसेच जिल्हा परिषद गटनिहाय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गटशेती व व्यवसायाला कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे संचालक जमदाडे व खतीब यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here