जत,संकेत टाइम्स : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
लेखी निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुजय शिंदे यांनी दोन संस्थांचे मतदान केले आहे.त्यापैकी संख फार्मिंग संस्था बंद आहे.तसेच जत तालुका खरेदी-विक्री संघ बंद आहे.तसेच राजाराम समोदायिक संस्था ही विसर्जित झाली असून त्याची चौकशी चालू आहे.त्याही संस्थेने बँकेला अ गटातील उमेदवाराला सुजय शिंदे यांनी मतदान केले आहे.त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे.
ठराव देणाऱ्या सूचक व अनुमोदक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. तसेच विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे सुसलाद सर्व सेवा सोसायटीचे थकबाकीदार असताना ते निवडणुकीला उभे राहिले व ते पराभूत झाले.आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अर्जाची छाननी का केली नाही,याची तपासणी करून संबंधित संस्थेवर ती कार्यवाही करावी.
ठरावाची ज्यांनी छाननी केली नाही त्यांच्यावर व तसेच आमदार सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी यापुर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. राजाराम सामुदायिक संस्था लि.को.बोबलाद मधील तक्रारी संबधी डी.डी.आर.नीलकंठ करे यांनी चुकीचा अहवाल सहकार मंञ्यांच्या दबाव खाली दिला आहे,त्याचीही चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. निवेदनाची प्रत उपनिंबधक यांनाही देण्यात आली आहे.