जत,संकेत टाइम्स : तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी मी कठीबध्द असून गावागावात विविध योजनातून पाणी योजना मंजूर केल्या आहेत.मोठा निधी या योजनाना शासनाकडून खेचून आणला आहे.त्यामुळे या योजना पुर्ण झाल्यानंतर पिण़्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही,असा विश्वास आमदार विक्रमसिंह सांवत यांनी व्यक्त केला.
मेंढीगेरी (ता.जत) येथे जल जीवन मिशन 88 लाख, 30हजार,434 निधी मंजूर झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत,यांच्या शुभहस्ते झाला.त्यावेळी आ.सांवत बोलत होते.
आमदार सांवत पुढे म्हणाले,आम्ही निवडणूकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पुर्तता करत आहोत.स्वच्छ पाणी,रस्ते,सुसज्ज शाळा खोल्या,शेतीसाठी पाणी पुरविणे,शहरातील शासकीय कार्यालयांना सुसज्ज इमारती,विज पुरवठा,नगरपरिषदेसह अनेक विकास योजनासाठी शेकडो कोटीचा निधी तालुक्यात आणला आहे. नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द आम्ही पुर्ण करत आहोत.तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांच्या घरापर्यत स्वच्छ, मुबलक पाणी मिळावे यासाठी माझा प्रयत्न आहे.
त्यासाठी ज्या गावात पाणी योजना नाहीत,तेथे पाणी योजना मंजूर करून निधी आणला आहे,त्याची कामे गतीने सुरू आहेत.उर्वरित गावे व रखडलेल्या गावातील पाणी योजना पुर्ण
करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे गावातच मुबलक पाणी उपलब्ध होईल,असेही आ.सांवत म्हणाले.
यावेळी जत तालुका कॉग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराय बिराजदार,माजी पं स सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जि.प.सदस्य महादेव पाटील,माजी नगरसेवक निलेश बामणे, उपअभियंता ग्रा.पा.पु,उपविभाग पं स जतचे प्रसाद काटकर,माजी सरपंच प्रकाश पाटील,माजी सरपंच सुभाष बिराजदार,उपसरपंच अजित कांबळे,ग्रा.प.सदस्य भीमराय बिराजदार,सदाशिव ऐवळे, अनिल करके,माजी उपसरपंच सुरेश व्हनवाडे,प्रकाश वाघमोडे,श्रीशैल शिंवंगशी,यल्लवा कांबळे,इतर ग्रामस्त उपस्थित होते.
मेंढीगेरी (ता.जत) येथे जल जीवन मिशन योजनेतून मंजूर पाणी योजनेच्या कामाचे भूमिपुजन करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर