अधिक माहिती अशी,कर्नाटकातून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा एका वाहनातून येणार असल्याची माहिती जत पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार जत शहरातील बिळूर रस्त्यावरील श्री.यलम्मा मंदिर गेट समोर पोलीसांनी सापळा लावला असता बिळूरकडून एक अशोक लेलँन्ड टेम्पो भरधाव वेगाने संशयित रित्या जाताना दिसला.त्यावर्ती संशय आल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करत गणपती मंदिरासमोर(बिळूर रोड) त्याला पकडत तपासणी केली.त्यात उग्र वासाची तंबाखू व गुटख्याने भरलेली पोती बॉक्स दिसून आले.त्यात तब्बल १५,लाख ८५ हजार ५८० रूपयाची सुंबधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ(गुटखा)आढळून आला आहे.
त्याशिवाय ५ लाख रूपयाचा अशोक लेलँन्ड कंपनीचा टेम्पो असा २० लाख ८५ हजार ५८० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम,अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले,डिवायएसपी रत्नाकर नवले, पो.नि.राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक लक्ष्मण खरात,पो.कॉ.सचिन हाक्के,विशाल बिले,शिवानंद चौगुले,योगेश पाटोळे,राजेंद्र पवार,श्री.खोत,कँप्टन गुंडेवाडे,होमगार्ड सिध्दु देवकते यांनी केली.
जत येथे पकडण्यात आलेली सुंगधी सुपारी,उग्र वासाची तंबाखू,वाहन, संशयित व पोलीस पथक