बोर्गी बु.येथे मटका घेतल्याप्रकरणी एकावर कारवाई

0
उमदी,संकेत टाइम्स : बोर्गी बु.ता.जत येथे बेकायदा मटका घेताना एकास पकडत त्यांच्याकडून ८७५ रूपये रोख व मुद्देमाल जप्त केला.गोपाल वासुदेव साळुंखे वय.२६ रा.बोर्गी बु.असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.उमदी पोलीसांनी हि कारवाई केली.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,बोर्गी.बु.येथील मकबुल नदाफ यांच्या हॉटेलचे मागे साळुंखे कल्याण नावाच्या मटक्यावर आकड्यावर स्व:ताच्या फायदे करिता पैसे घेऊन जुगाराचा खेळ खेळवत होता.त्याला उमदी पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे.सा.पो.नि.पंकज पवार यांच्या पथकांने हि कारवाई केली.अधिक तपास नितीन पलूसकर करत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.