उमदी,संकेत टाइम्स : सोनलगी (ता. जत) दारू पिऊन अपमान केल्याचा राग मनात धरून मुलाने बापाला काठीने केलेल्या मारहाणीत बापाचा दुर्देवी मुत्यू झाला होता.शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय 70) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी पहाटे घडली.पोलीसांनी संशयित मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी (वय 32) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याला जत न्यायालयात उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस दिलेली माहिती अशी,सोनलगी येथील शिवाप्पा चंद्राम पुजारी (वय ७५ ) हे दारू पिऊन मुलगा मल्लिकार्जुन पुजारी यास वारंवार शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी करत होते. गुरुवारी शिवाप्पा यांनी मुलगा मल्लिकार्जुन यास दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी केली होती. दरम्यान गावातील काही मध्यस्थांनी पिता-पुत्राला याबाबत समज दिली. पत्नी आणि मुलांच्या समोर वडील कायम आपला अपमान करत असल्याचा राग मल्लिकार्जुनच्या मनात होता.
दोघांच्यात झालेल्या वादात मल्लिकार्जुन याने वडीलास काठीने मारहाण केली आणि घराजवळील एका पत्र्यावर ढकलून दिले. यामध्ये शिवाप्पा पुजारी जागीच ठार झाले.पोलिसांनी प्रांरभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलगा मल्लिकार्जुनला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास सा.पो.नि.पंकज पवार करत आहेत.