ऐतिहासिक कामगिरी,शिक्षक बँकेचा व्याजदर एकअंकी | धरेप्पा कट्टीमनी यांची माहिती ; पुरोगामी सेवामंडळाची कामगिरी

0
10

करजगी,संकेत टाइम्स : शिक्षक बँकेने थोर महापुरुष असणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती निमित्त सभासदांना पुरोगामी सेवामंडळाची एक अंकी व्याजदराची ऐतिहासिक भेट दिली आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेवर गत दोन पंच वार्षिक सामान्य सभासदांनी शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवामंडळावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत अत्यंत काटकसरीने व पारदर्शीपणे कारभार करत चेअरमन चेअरमन यु. टी.जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली
एक अंकी कर्जाच्या व्याजदराची ऐतिहासिक कामगिरीचा बंपर धमाका सत्ताधारी शिक्षक समितीच्या संचालक मंडळाने केला असल्याची माहिती शिक्षक समितीचे जतचे नेते धरेप्पा कट्टीमनी यांनी दिली.

 

कट्टीमनी म्हणाले,चेअरमन यु. टी.जाधव यांच्या दुरदृष्टीपणामुळे शिक्षक बँकेच्या सभासदांचे 16 लाखाचे जामिनकी नं २ चे कर्ज  जवळजवळ 65 टक्के  प्रमाण आले असून त्या कर्जाचा व्याजदर सभासदांच्या मागणीवरून १०.३० टक्के वरून आजच्या संचालक मंडळ सभेत . ९. ९० टक्के करण्यात आला आहे.त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना असल्याचा आनंद आहे.
कट्टीमनी म्हणाले,विरोधकांनी हे होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते. एकदाही कर्जाचा व्याजदर न वाढवता सातवेळा कर्जाचे व्याजदर कमी करत दरवर्षी डीव्हीडंट वाढवत आला असल्याने पुन्हा बँकेवर सत्ताधारी पँनेलचा झेंडा फडकणार आहे.ज्यांनी सत्तेवर असताना 2.75 टक्के कर्जाचा व्याजदर वाढवला व गुंजभरही कमी केला नाही,तेच आता आम्ही एक अंकी व्याजदर करणार अशी खोटी आश्वासने देऊन सभासदांची दिशाभूल करत आहेत.त्यांना सभासदच योग्य वेळी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

कट्टीमनी म्हणाले, आजपर्यंतच्या शिक्षक बँकेच्या इतिहासात ज्या ज्या वेळेस शिक्षक समितीचे पुरोगामी सेवा मंडळ सत्तेवर असते, त्यावेळेस सभासदांना मोठा दिलासा देण्याचे काम होत असते. कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय नेहमी सभासदांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, राज्यसंघटक सयाजीराव पाटील, जिल्हा नेते बाबासाहेब लाड आदींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बँकेची दमदार वाटचाल सुरू असून सभासद हिताचे अनेक निर्णय यापूर्वीही सत्ताधाऱ्यांनी घेतले आहेत.

आज पर्यंत कर्जाच्या व्याजदरात सत्ताधारी संचालक मंडळाने सातव्यांदा घट करून कोरोना काळातसुद्धा शिक्षक बँकेचा काटकसरीने कारभार केल्यानेच हे शक्य झाले आहे.येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सामान्य सभासदांचा शिक्षक समितीवरच विश्वास असल्याने पुन्हा पुरोगामी सेवा मंडळाला सेवा करण्याची संधी नक्कीच सामान्य सभासद देतील यात तिळमात्र शंका नाही.

 

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, सरचिटणीस व संचालक हरिभाऊ गावडे, व्हाईस चेअरमन राजाराम सावंत,तसेच पुरोगामी सेवा मंडळाचे संचालक  तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे श्रीकांत माळी, सुनील गुरव, महादेव माळी ,बाळासाहेब आडके ,रमेश पाटील, सदाशिव पाटील , शिवाजीराव पवार,श्रेनिक चौगुले, अर्चना कोळेकर , भागवत कोळेकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले, प्रशासन अधिकारी म्हांतेश इटंगी, विजय नवले, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here