ऐतिहासिक कामगिरी,शिक्षक बँकेचा व्याजदर एकअंकी | धरेप्पा कट्टीमनी यांची माहिती ; पुरोगामी सेवामंडळाची कामगिरी
कट्टीमनी म्हणाले, आजपर्यंतच्या शिक्षक बँकेच्या इतिहासात ज्या ज्या वेळेस शिक्षक समितीचे पुरोगामी सेवा मंडळ सत्तेवर असते, त्यावेळेस सभासदांना मोठा दिलासा देण्याचे काम होत असते. कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय नेहमी सभासदांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, राज्यसंघटक सयाजीराव पाटील, जिल्हा नेते बाबासाहेब लाड आदींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बँकेची दमदार वाटचाल सुरू असून सभासद हिताचे अनेक निर्णय यापूर्वीही सत्ताधाऱ्यांनी घेतले आहेत.

आज पर्यंत कर्जाच्या व्याजदरात सत्ताधारी संचालक मंडळाने सातव्यांदा घट करून कोरोना काळातसुद्धा शिक्षक बँकेचा काटकसरीने कारभार केल्यानेच हे शक्य झाले आहे.येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सामान्य सभासदांचा शिक्षक समितीवरच विश्वास असल्याने पुन्हा पुरोगामी सेवा मंडळाला सेवा करण्याची संधी नक्कीच सामान्य सभासद देतील यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, सरचिटणीस व संचालक हरिभाऊ गावडे, व्हाईस चेअरमन राजाराम सावंत,तसेच पुरोगामी सेवा मंडळाचे संचालक तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे श्रीकांत माळी, सुनील गुरव, महादेव माळी ,बाळासाहेब आडके ,रमेश पाटील, सदाशिव पाटील , शिवाजीराव पवार,श्रेनिक चौगुले, अर्चना कोळेकर , भागवत कोळेकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले, प्रशासन अधिकारी म्हांतेश इटंगी, विजय नवले, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.