ढालगाव, संकेत टाइम्स : कवठेमंकाळ येथील शितल गुरुवसपा कुंभार हीची इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट आणि आदित्य अरुण चव्हाण राहणार ढालेवाडी यांची इंडियन नेव्ही मध्ये लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल ढालगाव ता.कवठेमंकाळ येथील स्वराज कलेक्शनचे मालक श्री अजितराव खराडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी माजी सैनिक अजितराव खराडे म्हणाले,आपल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींनी शीतल कुंभार आणि आदित्य चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लष्करामध्ये तसेच इथे क्षेत्रातील सर्विस मध्ये ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करावा सत्कार करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या भागातील मुला-मुलींना याची प्रेरणा मिळावी.
यावेळी ढालगावचे सरपंच जनार्धन देसाई माजीउपसरपंच माधवराव देसाई,माजी उपसरपंच विजय घागरे, चेअरमन मधुकर देसाई ग्रामपंचायत सदस्य दिलीप झुरे, बालक वाघमारे,माजी उपसरपंच दिलीप देसाई,माजी सैनिक दत्तू घागरे राजाराम देसाई,ढालगाव व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष भारत ढोबळे , राधे ट्रेडर्सचे मालक अमित देसाई, मारुती गडदे,सुरेश देसाई, तसेच ढालगाव आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सैनिक, वीर जवान सांगली चे सागर बाबर, भाऊसाहेब पाटील, इंजिनियर गणेश पवार तसेच स्वराज मल्टीस्टेट निधी बँकेच्या डायरेक्टर सौ सुनीता खराडे ,डॉक्टर महेश पाटील भगवान सरगर सर, आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.