जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता ; उपजिल्हाधिकारी | प्रभागरचनेचे परिशिष्ट 4 व 4(अ) प्रसिध्द

0
3

सांगली : सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त पुणे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद सांगली व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचे परिशिष्ट 4 व परिशिष्ट 4(अ) जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सांगली च्या http://www.sangli.nic.in या संकेतस्थळावर दि. 27 जून 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दि. 10 मे 2022 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने दि. 2 जून 2022 रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली होती. प्रस्तुत प्रारूप प्रभाग रचनेच्या अधिसूचनेवर दि. 2 ते 8 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी होता. त्यास अनुसरून सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी, जत, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज या तालुक्यामध्ये एकूण 34 हरकती प्राप्त झाल्या आहेत.

 

त्यापैकी विभागीय आयुक्त पुणे यांनी 24 हरकती अमान्य केल्या असून 7 हरकती मान्य केल्या आहेत व 3 हरकती अंशत: मान्य केल्या आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक ते बदल करून सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त पुणे यांनी मान्यता दिली असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here