निगडी खुर्द, संकेत टाइम्स : जत पुर्व भागात आज सकाळी अचानक भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने जतच्या पूर्व भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असून अद्याप कोणतेही हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात
आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जत पर्व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. माडग्याळ, सोन्याळ, बेळोडगी,बोर्गी, करजगी, कोंतेवबोबलाद, संख, गिरगाव व मोरबगी आदी गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी टीव्ही पाहणारे व घरात झोपलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवले आहेत . घरातील भांडी पडणे, बंद पंखे हालणे,पत्र्याचे घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. भूकंपाचे केंद्र बिंदू विजयपूर (विजापूर) जिल्ह्यात विजयपूर पासून पंधरा किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदरच्या भुकंपाची तिव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचे समजते. जत पुर्व भागात तरी कोणतेही नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. केवळ धक्के जाणवल्याचे काही नागरिकांनी सांगितले. काल रात्री पासून जत पुर्व भागात पाऊसाची संततधार सुरु आहे.आज सकाळपासूनही रिमझिम पाऊस सुरू असल्याने बरेच नागरिक घरीच होते.अचानक घराचे पत्रे,साहित्य हलू लागल्याचे जाणवले.