डफळापूर, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कुडणूर येथे हॅंडग्रेनेड बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे. डफळापूर जवळील कुडनूर गावातील मराठी शाळेत सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्कादायक घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी जत पोलिसांना तातडीनं दिली. त्यानंतर पोलीस आणि सांगलीतील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श बॉम्ब ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या स्थानिक माहितीनुसार, कुडनूर शाळेतील मुलं क्रिकेट खेळत असताना शाळेच्या खोलीत चेंडू गेला. त्यानंतर गावातील मुलं चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले. त्यावेळी त्यांना शाळेत हॅंडग्रेनेड बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलांनी ही खळबळजनक माहिती गावातील नागरिकांना आणि उपसरपंच गुलाब पांढरे यांना सांगितली.
त्यानंतर पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांनी जत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस आणि सांगलीतील बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब ताब्यात घेतला. यापूर्वीही २०१७ मध्ये कुडनूर मध्ये दोन बॉम्ब सापडले होते. बॉम्ब शोधक पथक त्यावेळीही दाखल झाले होते. अशीच घटना आताही घडल्याने डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यापुर्वीही कुडणूर अशाच पद्धतीने हॅंडग्रेनेड बॉम्ब सापडले होते,ते कोठून आले होते,हे आजही सृष्ट झालेले नाही, शनिवारी पुन्हा आणखीन एक बाम्ब सापडल्याने पालकांत भिंतीचे वातावरण पसरले आहे.