मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार अनिल बाबर व यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
4

सांगली :‍ आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे दिनांक 3 ऑगस्ट रोजी निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विटा येथील निवासस्थानी येवून त्यांचे व कुटुंबियांचे सात्वंन केले.

  

यावेळी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनिल पवार, अप्पर पोलीस ‍ अधिक्षक मनिषा दुबुले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

       

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय शोभाताई बाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. तसेच बाबर कुटुंबियांशी संवाद साधताना त्यांना या दु:खातून सावरण्यासाठी धीर दिला. यावेळी आमदार अनिल बाबर यांच्यासह चिरंजीव सुहास व अमोल, सुना शितल व सोनिया , नातवंडे शौर्य, राजवीर, रणवीर, रणदिप यांच्यासह बाबर कुटुंबियांतील जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here