भाजपाच्या वतीने रविवारी मोटारसायकल तिरंगा रँली ; विलासराव जगताप | मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन

0
जत,संकेत टाइम्स : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जत तालुका भाजपाच्या वतीने रविवारी दि.14 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता जत शहरामध्ये मोटारसायकल वरून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे,तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी मार्केट यार्ड जत येथे स्वतः ची मोटरसायकल घेऊन सहभागी व्हावे,असे आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे.
देशाच्या ७५ व्या वर्धापन दिननिमित्त देशभर अमृत्त महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनाला देशभर मोठा प्रतिसाद मिळत आहे.संपूर्ण देशच भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे करीत आहे. प्रत्येक नागरीक, संस्था विविध उपक्रम राबवून मातृभूमीच्या प्रती प्रेमाची, निष्ठेची व अभिमानाची जाज्वल्य भावना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाप्रती आपली निष्ठा व आस्था प्रदर्शित करीत भव्य दिव्य तिरंगा राष्ट्रध्वज साकारण्याचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

 

 

देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महात्मे, क्रांतिकारक,जहालवादी नेते,मवाळवादी नेते यांच्या एकसुत्री कार्यक्रमाने व बलीदानानेच 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात  मोकळा श्वास घेतो आहे.त्याकाळी स्वातंत्र्यासाठी घरा-घरातुन आवाज बुलंद व्हायचा व स्वातंत्र्यासाठी संघर्षमय वातावरण निर्माण करून संपूर्ण युवावर्ग इंग्रजांशी लोहा घेण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे.आज आपल्याला आपल्या क्रांतिकारकांचे, शहिदांचे,थोरमहात्म्यांचे अनुकरण करून त्यांनी मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून आणि देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहे.

 

Rate Card
त्यानिमित्त देशभर हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत १३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यत अमृत्त महोत्सव साजरा करण्यात येत आहे.जत तालुका भाजपाकडून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक उमेश शांत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप,तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत,शहर अध्यक्ष आण्णा भिसे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बसवराज पाटील,शहर अध्यक्ष कुमार कोळी हे कष्ट घेत आहेत.

 

जत शहरातून भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा रँली काढण्यात येत आहे.तालुक्यातील संस्था,शाळा,विविध खाजगी उद्योग, दुकाने,घरावर राष्टध्वज उभारणी करावेत,असेही आवाहन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.