चिकोडी : अथणीचे आमदार तथा कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कार चालकाचा समोर आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून कार कालव्यात पलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसून लक्ष्मण सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे घरी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करून अथणीहुन बेळगांवकडे जत-जांबोटी राज्यमार्ग 31 या मार्गावरून निघाले होते.
त्यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत व श्वास घेताना त्रास होत असल्याने हारुगेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बेळगावकडे नेले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली. अपघाताची