संख,संकेत टाइम्स : येथील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेच्या, श्री आर के पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला एम.एस्सी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला(दुर शिक्षण) शिवाजी विद्यापीठाची मान्यता मिळाली असून महाविद्यालयामध्ये या अभ्यासक्रमांची चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.अशी माहिती संस्थेचे सचिव अजय बिरादार यांनी दिली.
संख येथील श्री शिवलिंगेश्वर संस्था ही ग्रामीण व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय करून देणारी संस्था आहे.या संस्थेने श्री आर के पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरु करून उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये शिवाजी विद्यापीठाकडून दुर शिक्षण चे एम.एस्सी. गणित या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असल्याने नोकरी व व्यवसायामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पदवीधारक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणाची मोठीं सोय झाली आहे.
तरी परिसरातील नोकरी व व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अजय बिरादार यांनी केले आहे.तसेच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी 7448000616 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.