डफळापूर,संकेत टाइम्स : खलाटी ता.जत येथील सेवा निवृत्त पोस्ट मास्तर बबन चनबसू बनसोडे (वय 64) यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने गुरूवारी निधन झाले.खलाटी येथील सामन्य कुंटुबातून आलेल्या बबन बनसोडे यांनी खलाटी येथून भारतीय टपाल सेवेत 27 संप्टेबर 1980 रोजी त्यांच्या खलाटी गावी ईडी कम् बिपीएम या पदापासून सुरूवात केली होती.ते 31 मे 2016 रोजी ते डाक सहाय्यक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी मोठा कष्टाने आपल्या कुंटुबाला सावरले होते.
मनमिळावू स्वभाव,आंनदाने राहणारे बबन बनसोडे यांना गुरूवारी ह्रदय विकाराचा झटका आला.त्यांना तात्काळ जत येथील रुग्णालयात दाखल केले होते.मात्र त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,भाऊ,पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रविवार सकाळी ८ वाजता खलाटी येथे रक्षाविसर्जन ठेवण्यात आले आहे.