कॉ.हणमंत कोळी सर्व समावेशक नेतृत्व | थेट संरपच पदाचे उमेदवार | डफळापूर ग्रामपंचायत निवडणूक | कॉ.मिना कोळीही लढणार

0
जत तालुक्यातील सधन असलेल्या ग्रामपंचायत डफळापूरच्या निवडणूकीत सातत्याने विविध आंदोलने करून समाजाशी बांधिलकी जपलेले डाव्या विचार सरणीचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.हणमंत कोळी हे थेट संरपच पदाची निवडणूक लढविणार आहेत.तर त्यांच्या पत्नी कॉ.सौ.मिना कोळी ह्या 1 नंबर वार्डतून सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

डफळापूरच्या विकास आजही कागदावर आहे.सत्ताधिशानी सत्तास्थाने मिळविली,कोट्यावधीचा निधी खर्च झाला, मात्र विकास कुठे केला हा संशोधनाचा प्रश्न आहे.नागरिकांचे महत्वाचे प्रश्न अजूनही तसेच आहेत.या प्रश्नाची सोडवणूक करण्याबरोबर डफळापूर  गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी मी थेट संरपच निवडणूक तर माझी पत्नी वार्ड नं.१ मध्ये सर्व साधारण महिला गटातून निवडणूक लढविणार असल्याचे कॉ.हणमंत कोळी यांनी सांगितले.
मी सातत्याने गावच्या विकासासाठी लढत आहे,आंदोलने करत आहे.समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना ग्रामपंचा‌यत आपली वाटली पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे,गावात सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा लढा सातत्याने सुरू असतो.

 

 

आशा वर्कर्स,गट प्रवर्तक,कामगारासाठी अनेक आंदोलन आम्ही केली आहेत.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोगाच्या‌ शिफारसी लागू करा,रेशकार्ड सोडा आदेश मागे घ्यावेत,डफळापूर बँकेत कर्मचारी नेमावेत,घरगूती सिलेंडर दर वाढ मागे घ्यावी.भारत बंद आंदोलन, रस्त्यावरील खड्डे मुजवावेत म्हणून रस्त्यात वृक्षारोपन,विद्यार्थ्यासाठी बस सुरू करावी,मिरवाड तलावात पाणी सोडावे,डफळापूर,बेंळूखीसह परिसरात धुमाकूळ घातलेल्या तरसाचा बंदोबस्त करावा म्हणून,आशांना कोरोना योध्दा म्हणून मदत करावी म्हणून,डफळापूर कारखान्यात स्थानिक तरूणांना रोजगार द्यावा म्हणून,डफळापूर पाणी योजनेसाठी,डफळापूरातील पाणी,गटारी,रस्ते,हातपंप दुरूस्ती,गटारी यासाठी थेट संरपचाच्या घरासमोर आंदोलन केले आहे.अशा अनेक आंदोलनातून आम्ही डफळापूरातील सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी सातत्याने लढत आहोत.आता नागरिकांना आमच्या या लढ्याला त्याचे मतदान रूपी दान देऊन ताकत द्यावी,असे आवाहनही कॉ.हणमंत कोळी व कॉ.मिना कोळी यांनी केले आहे.

 

ग्रामविकासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी राबविणार 
ग्रामविकासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून, सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजावून घेतल्यास गावचा सर्वांगीण होण्यास कुणीही रोखू शकत नाही,शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि गावातील निराधार आणि वयस्कर नागरिकांचे पालनपोषण करावे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्वाचे असून, विकासाच्या प्रक्रियेत दोघांच्याही भूमिकाचे महत्त्व विषद केले आहे. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सुरळीत करभरणा केल्यास गावच्या विकास प्रक्रियेत सरकारी निधी आणि करातील पैसे असे दुप्पटीने अर्थसहाय्य प्राप्त होऊन गावचा कायापालट होईल,नेमके हेच करण्यात आतापर्यतचे सत्ताधारी कमी पडलेत,त्यामुळे जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करून डफळापूरला जिल्ह्यात आदर्श गाव करायचे आहेत.
– कॉ.हणमंत कोळी
महिलासह सर्वाच्या हितासाठी मैदानात
मी सातत्याने आशा वर्कर्स, गट प्रवर्तक सह महिलाच्या प्रश्नासाठी तालुका,जिल्हा, राज्य,अगदी देश पातळीवर आंदोलने करून न्याय मिळवून दिला आहे. आशा,गट प्रवर्तकांना आंदोलनातून मोठा लाभ मिळवून दिला आहे. आम्ही देशपातळीवर आशांसाठी आंदोलने उभी केली आहेत.गावातही महिलांच्यासाठी मी काम करत आहे. कोरोना सारख्या महामारीत नागरिकांची आरोग्याची काळजी घेतली आहे.गावातील अनेक प्रश्न सध्या सोडविणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.यापुढे  डफळापूरातील प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढविणार आहे.
– कॉ.मिना कोळी

 

 

कॉ.कोळी यांची काही प्रभावी आंदोलने
– श्रीपती शुगर कारखान्यात स्थानिकांना रोजगार द्यावा
–  डफळापूर ता.जत येथे सुरू होत असलेल्या श्रीपती शुगर साखर कारखान्यात सध्या स्थानिक बेरोजगार तरूणांना काम द्यावे म्हणून थेट माजी मंत्री विश्वजीत कदम यांना निवेदन दिले.
– डफळापूरला वरदान असलेल्या मिरवाड तलावात पाणी सोडावे म्हणून जत-सांगली मार्गावर रास्तारोको आंदोलन करून पाणी सोडण्यास भाग पाडले.
– गावातील कैकाडी गल्ली,पुकळे प्लॉटमधील गटारी,रस्ता,हातपंप दुरूस्ती,अतिक्रमण काढणे,तलावातील पाणी साठ्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन, गटारीची वेळोवेळी स्वच्छता करणे,राष्ट्रीय पेयजल सुरू सुरू करणे आदी मागण्यासाठी आंदोलन केले.
Rate Card
– डफळापूर येथील पेयजल पाणी पुरवठा योजनेच्या निधीसाठी आंदोलन केले,तब्बल ८० लाखाचा निधी देण्यास प्रशासनास भाग पाडले.
– डफळापूरहून जतला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत बस नव्हती,त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बस सुरू केली.
– डफळापूर येथे खोदलेले रस्ते दुरूस्त करावेत,म्हणून आंदोलन केल्यानंतर खड्डे भरण्यात आले.
– शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत द्यावी म्हणून डफळापूर येथे रास्ता रोको आंदोलन केले.
– घरगूती सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात सिलेंडर घराबाहेर ठेवून जिल्हाभर आंदोलन केले.
– डफळापूर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कर्मचारी नेमावेत म्हणून आंदोलन केले.
– ‘रेशन सोडा’ आदेश मागे घेवून सामान्य लोकांना स्वस्त धान्य पुरवठा कायम ठेवावा म्हणून आंदोलन केले.
– डफळापूरसह परिसरातील २०० वर बांधकाम कामगारांना शासनाचा लाभ मिळवून दिला.१०० वर कामगारांच्या मुलाना शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून दिले.तब्बल १५० कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून ऑनलाइन अर्ज भरून दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.