सर्व गावात आमचा गट मजबूत | थेट संरपच निवडणूकीत सक्षम उमेदवार,विकासाचे व्हिजन घेऊन मैदानात

0
3
जत,संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील  डफळापूरसह कुडणूर, जिरग्याळ, खलाटी, बेंळूखी, बाज या गावात ग्रामपंचायत निवडणूकीत आमचा गट मजबूत असून सर्व ग्रामपंचायतीवर सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही गावात स्थानिक आघाडी,काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत. यावेळी आमच्या विचाराचे मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतिल असा आशावाद माझी भूमिका स्पष्ट करताना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

जत पश्चिम भागातील लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांचे चिरजिंव तथा युवा नेते म्हणून दिग्विजय चव्हाण यांची ओळख आहे.पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असलेले चव्हाण यांनी स्वर्गिय सुनिल बापू चव्हाण यांच्या पश्चात दिग्विजय यांनी राजकीय संघर्ष कायम ठेवला आहे. ग्रामपंचायत निवडनूकीत झाडून कामाला लागले आहेत. गत पाच वर्षापासून जत पश्चिम भागात बापू गट तसेच त्यांचा समर्थक गट कार्यरत आहे.गेल्या पाच वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक गावात त्यांनी केलेल्या विकास कामावर व भविष्यात सक्षम गावे बनविण्यासाठी ते पश्चिम भागातील ग्रामपंचायतीवर आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

जवळपास सर्वच गावात त्यांनी स्थानिक आघाडी जुळवून घेत आपली घौडदोड सुरू ठेवली आहे. डफळापूर परिसरातील सर्व गावात आम्ही विकास कामे केली आहेत. डफळापूर सह सर्वच ठिकाणी भविष्यात गावे विकास पर्वात आणावयाची आहेत. त्यासाठी थेट संरपच निवडणूकीत सुसंस्कृत्त, शिक्षित,अनभुवी उमेदवार निवडून आणून परिसरातील गावाचा कायापालट करायचा आहे. त्यामुळे आमच्या व्हिजनला जनतेनी साथ द्यावी, असे आवाहन दिग्विजय चव्हाण यांनी शेवटी केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here