विटा,संकेत टाइम्स : उदगीरी साखर कारखान्याकडे जाणारी सुमारे 100 ते 150 ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्यात आली दरम्यान साखर सम्राटाचे आंदोलन मोडीत काढण्याचे षडयंत्र यशस्वी होवू देणार नाही, साखर सम्राटांना पायदळी तुडवू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
गुरुवारी सकाळी उदगिरी कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी सर्व वाहतूक बंद करण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले होते मात्र ते पाळले नाही,त्यामुळे संतप्त बामणी व परिसरातील कार्यकर्त्यांनी रात्री एक नंतर आलेली सर्व ऊस वाहने रोखली त्यांची हवा सोडण्यात आली.
यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये बाचाबाची झाली मात्र नंतर पोलिसांनीही मवाळ भूमिका घेत सहकार्याची भूमिका घेतली.जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले.कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. साखर सम्राटांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, एक रकमी एफ आर पी मिळालीच पाहिजे., तोडणी मजूर महामंडळ झालेच पाहिजे, साखरेचा भाव 35 रुपये झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
महेश खराडे म्हणाले,कारखानदार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र कारखानदारांचे षडयंत्र आम्ही यशस्वी होवू देणार नाही.
आम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहोतच पण वाहतूकदारांच्या साठी तोडणी मजूर महामंडळाची स्थापना व्हावी.यासाठी प्रयत्न करत आहोत,गंडा घालणाऱ्या मजुराच्या शोधासाठी राज्य व्यापी पोलीस पथक निर्माण करावे यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.साखरेची किंमत 35 आणि इथनॉलची किंमत 65 रुपये व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही शेतकरी वाहतुकदार,मजूर आणि साखर कारखानदारांच्या मागण्यासाठी संघर्ष करत आहोत.
यावेळी बामणी शाखा अध्यक्ष सभाजी शिंदे,उपाध्यक्ष वैभव कुलकर्णी, धनाजी सावंत,भुंपाल माळी, विनायक माने, दत्ता जाधव,पंढरीनाथ जाधव,अनिल जाधव,निशिकांत पोतदार, उत्तम चंदनशिवे, शांताराम पाटील, गोरख चंदनशिवे,अनिल पाटील,किसन पाटील, धोंडीराम पाटील,प्रतीक पाटील,रवी पाटील,सुभाष पाटील,सागर पाटील, अमित रवताले,महेंद्र रसाळ आदीसह शेतकरी उपस्थित होते.
बामणी ता.मिरज येथे कारखान्याकडे जाणारी वाहने आंदोलकांनी अडविली.