गाव विस्तारली, समस्या तिथेच!

0

    • जत : राज्यातील हाजारो गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या रणसंग्रमात विरोधक सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधारी विरोधकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडतील, आश्वसानांचे गाजर दाखवले जाईल आणि प्रचाराचा धुरळा जमिनीवर येताच सगळं काही विसरुन नवे कारभारी कामाला लागतील. नागरीकरणामुळे मोठी गावे,निम्य शहरं दिवसेंदिवस बकाल होत चालली असून डंपिंग ग्राऊंडप्रमाणे नागरी समस्यांचे देखील डोंगर उभे राहात आहेत.

 

  • पिण्याचे पुरेसे पाणी, रस्ते, खेळाची मैदानं, घनकचऱ्याची विल्हेवाट, नागरी आरोग्य या मूलभूत नागरी सुविधांबाबत सगळीकडे सारखीच आबाळ असताना ‘स्मार्ट गावां’चे स्वप्न दाखवले जात आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे गावांवरील नागरी ताण वाढत असताना राजकीय मंडळी ‘मोफत’च्या गोष्टी करत आहेत. वाढते अतिक्रमण, नियोजनाचा अभाव, मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार आणि प्रशासनाची राजकीय सलगी, हे विषय सगळीकडे ‘कॉमन’ आहेत. 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.