सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणेच्या अनुशंगाने होणाऱ्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करुन पुनर्विचार याचिका दाखल करणेसंदर्भात खासदार संजयकाका पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेवून आग्रही मागणी केली होती.
सदर भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करुन राज्य शासनाच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करणेसंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच याबद्दल राज्यशासनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे आश्वासित केले होते.
त्यानूसार आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यशासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करुन या निर्णयासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गायरान जमीनीमध्ये सध्या वास्तव्यास असणाऱ्या गरीब लोकांना दिलासा मिळालेला आहे.खासदार संजयकाका पाटील यांनी या राज्यशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.