कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या निषेध करत कोल्हापुरात शिवसेनेने काढला तिरडी मोर्चा

0
कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील जत कर्नाटकात सामील करून घेण्याविषयी केलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई याने  वक्तत्व्याच्या निषेर्धात शुक्रवारी(२५) ला सकाळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात तिरडी मोर्चा काढण्यात आला. कर्नाटकच्या बसेस आडवून काळ्या शाईने ‘जय महाराष्ट्र’ असे लिहत निषेध करण्यात आला.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तृत्वावरून राज्यभर निषेध केला जात आहे.आज कोल्हापूरात शिवसेनेच्यावतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निर्षेर्धात ट्रेझरी रस्ता ते दसरा चौक असा तिरडी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी तिरडी मोर्चातील बोम्मई यांचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली.

 

 

Rate Card
जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे यांनी केले. यावेळी युवासेना पदाधिकारी मंजित माने, महिला आघाडी प्रमुख स्मिता सावंत, वैभव जाधव, अवधेश कसबे, विराज पाटील, विशाल देवकुळे, अभिजीत बुकशेट आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.