मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रख्यात विचारवंत आणि लोकशाहीवादी कार्यकर्ते प्रा.डॉ.आनंद तेलतुंबडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तळोजा कारागृहातून दोन वर्षानंतर सुटका झाली.
जेलमधून बाहेर आल्यानंतर जनता दल (युनाइडेड) चे नॅशनल जनरल सेक्रेटरी आमदार कपिल पाटील यांनी तेलतुंबडे यांचं स्वागत केलं. सोबत तेलतुंबडे यांच्या पत्नी श्रीमती रमा आणि मुलगी रश्मी उपस्थित होते.
संविधान दिनाच्या दिवशी आनंद तेलतुंबडे जेल बाहेर आल्याने न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दुणावला आहे. अनेक निरपराध लोकशाहीवादी कार्यकर्ते यांच्या सुटकेचा मार्ग यातून मोकळा होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.