जत,संकेत टाइम्स : गुड्डापूर यात्रा व ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात बंदी असलेल्या गोवा मेड दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह तिघांना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.जत नजिक नागज मार्गावर शुक्रवार सकाळी हि कारवाई करण्यात आली.संतोष परसराम कांबळे,(रा.कोळिगिरी),मेघराज यशवंत निकम,संभाजी वसंत ननावरे (दोघे रा.माडग्याळ) या तिघांना ताब्यात घेतले आहे.तर महिंद्रा स्कॉपिओसह ८ लाख ७२ हजार २५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी,गुड्डापूर दानम्मादेवी यात्रा व ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून गस्त सुरू आहे.पथक परराज्यातील मद्य तस्करी रोकण्याच्या उद्देशाने जत नागज रोडवर गस्त घालत असताना महाराष्ट्रात बंदी असलेली गोवामेड दारूची वाहतूक करत असलेली महिंद्रा स्कॉपिओ वाहन आढळून आले.त्यात गोवा बनावटीचे मँकडोल नं.१ व्हिस्की व इंप्लेरिअली ब्लू व्हिस्की व रॉयल स्टॉग व गोल्ड अँण्ड ब्लँक रमचे २० बॉक्स ,१ स्कॉपिओ वाहन,दोन स्मार्ट फोन,१ साधा मोबाईल असे ८ लाख २ हजार २४० रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताना जत न्यायालयाने एक दिवशी कोठडी सुनावली आहे.कोल्हापूरचे उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी व अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कचे निरिक्षक अरूण कोळी,अभिनंदन कांबळे,जितेंद्र पवार,एस.एस.केंगारे,जवान संतोष बिराजदार, स्वप्नील आटपाडकर,सचिन सांवत,वसंत घुगरे यांच्या पथकाने हि कारवाई केली.
जत येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारे वाहन व संशयिताना पोलीसांनी पकडले.