संख : तिकोंडी (ता.जत) येथील नागरिक सर्वजण कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत.गावात कर्नाटकाचा ध्वज लावण्यात आले.कर्नाटक मुख्यमंत्रीचे पोस्टर लावण्यात आले
पूर्व भागातील तिकोंडी येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाचा ध्वज घेऊन ग्रामपंचायती समोरुन बस स्टँण्ड पर्यंत पदयात्रा काढली.वेशीवर कर्नाटकाचा ध्वज लावण्यात आले.कर्नाटक सरकारचे आभार मानण्यात आले.
गावापासून ३ किलोमीटर अंतरावर बिजापूर जिल्हा आहे.कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तालुक्यातील ४२ गावे समावेश करून घेणार असल्याचे सांगितले.कर्नाटक सरकाराने तीन वर्षांपासून तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी तलावात सोडले आहे. कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते.महाराष्ट्रातील नेते,सरकार म्हैसाळचे पाणी देतो म्हणून गेली ५० वर्षांपासून निवडणूक लढवित आहे.पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम केले आहे.आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाही.
कर्नाटक मुख्यमंत्र्याचे पोस्टर लावण्यात आले.कर्नाटक सरकारचे आभार मानले.पोलिसांनी हस्तक्षेप करुन पोस्टर काढले.कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊ असे आंदोलनकर्तांनी सांगितले.
यावेळी महानंतेश अमृत्तटी, वसीम मुजावर,महानंतेश राचगोंड,सोमनिंग चौधरी, रामू नुली ,महादेव कोहळ्ळी,मल्लाप्पा गोब्बी,अनिल हट्टी,
तम्माराया अमृत्तटी,इरान्ना राचगोंड,गौडाप्पा माडोळी,अंबाण्णा कोळी उपस्थित होते.