महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून जतकडे पाठ : विक्रम ढोणे

0
जत,संकेत टाइम्स : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर राज्यभर तीव्र लोकभावना व वादंग निर्माण होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी शेजारील कोल्हापूर, सातारा दौरा करतात पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील जनतेच्या भावना जाणून घेऊन त्यांना विश्वास देणे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या भागाकडे दुर्लक्ष करून जतच्या सीमाभागातील जनतेच्या भावनेकडे पाठ फिरवली आहे,असे उद्गार युवा नेते विक्रम ढोणे यांनी काढले आहेत.

 

ढोणे म्हणाले,स्वांतत्र्याच्या ७५ वर्षानंतरही
पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.केंद्र राज्यातील सरकारे बदलली ‌मात्र या सीमावर्ती भागातील परिस्थिती जैसेथे आहे.२०१२ साली प्रथमतः जनतेतून पाणी द्या अन्यथा कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या अशी मागणी पुढे आली त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी तालुक्याला भेट देऊन जनतेशी संवाद साधला आणि माडग्याळ येथे चारा छावणी आणि तालुक्यात पाण्याचे टँकर चालू झाले त्यानंतर कन्नड भाषिक गावात मराठी शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राज्य स्तरावर सुरू झाली मंत्री मंडळ बैठकीत निर्णय ही झाले ९ गावे ७८ वाड्यावस्ती येथे मराठी शाळा सुरू होणार यासाठी कागदी घोडे नाचवले  पण प्रत्यक्षात १० वर्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही.

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर जतकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण अपेक्षाभंग झाला. महाराष्ट्र शासनाने तातडीने शाश्वत कृती आराखडा तयार करून कृतिशील कार्यक्रम हाती घ्यावा. येथील जनतेला विश्वास द्यावा. विस्तारीत म्हैसाळ योजनेसाठी ६ टिएमसी पाणी मंजूर केल्याची चर्चा पण यासाठी निधी मंजूर कधी होणार.एवढी महाकाय 2000 कोटी रुपयांची योजना मंजूर व त्याची प्रत्यक्ष कामाला सुरुवात यात आणखी किती पिढ्या जाणार हा प्रश्न आहे. असे विक्रम ढोणे म्हणाले.
महाराष्ट्र शासन जागे होणार का ?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दाव्यानंतर राज्यभर जागृत्ती झाली,निषेध सुरू झाले.अनेक पडद्याआडचे राजकर्ते आता भाषणे देऊ लागले आहेत.सिमावर्ती भागातील नागरिकांनी आम्हाला पाणी द्या,अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिला आहे.दोन्ही राज्यातील वाद सोयीस्करपणे वाढविला जात आहे.महाराष्ट्र शासनाने यावर गांर्भिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,असेही ढोणे म्हणाले.
       
        
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.