शिराळा : सांगली वन विभाग अंतर्गत शिराळा वनपरिक्षेत्रामधील मोजे कामेरी ता.वाळवा येथील पाचवा टप्पा या स्थानिक नावाने ओळखल्या जाण्याच्या क्षेत्रात दिनांक ३ डिसेंबर पासून एक रानगवा आढळून आला.गव्याचे निरीक्षण केले असता त्याच्या हालचालीवरून तो जखमी असल्याचे दिसून आले. गव्याचा बचाव व उपचार करणेकरिता सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मागोवा घेत होते.
निता कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सांगली डॉ.अजित साजणे वनक्षेत्रपाल (शिराळा)सचिन जाधव, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, डॉ अंबादास माडकर पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर वनरक्षक रायना पाटोळे, अमोल साठे, प्रकाश पाटील, हनमंत पाटील, वनमजूर शहाजी पाटील,डॉ. संतोष वाळवेकर वन्यजीव प्रेमी सुशीलकुमार गायकवाड, अमित कुंभार यांनी सदर गव्यास सुरक्षितरित्या रेस्कु केले असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. गवा सुस्थितीत झालेवर त्याला त्याचे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.