सोशल मीडिया हे आधुनिक अर्थार्जनाचे साधन | – प्रसिद्ध युट्युबर अनिल बन्ने

0
जत,संकेत टाइम्स : सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून ते अर्थाजनाचे पर्यायाने पैसे कमविण्याचे एक उत्तम साधन असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युट्युबर व पत्रकार अनिल बन्ने यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे माजी विद्यार्थी संघटना, अर्थशास्त्र, वाणिज्य विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवडा चालणाऱ्या उद्योजकता विकास या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या सहाव्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ.अशोक बोगुलवार तर समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँड.राजकुमार म्हमाने उपस्थित होते.
अधिक बोलताना ते म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अनेक दृक व श्राव्य घटना व माहितीची गरज लक्षात घेता सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. अशी माहिती पुरवून युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, शेअरचाँट त्याचबरोबर इतर सोशल मीडियातुन लाखो रुपयाचे अर्थार्जन होते. पर्यायाने माहिती पुरवून पैसे मिळतात. गावाकडची टेस्ट व संचित टीव्ही न्यूजच्या माध्यमातून मीही सोशल मीडियावर लाखो फॉलोवरसह सक्रिय आहे. स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर तर प्रा. नारायन सकटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. शकंर गावडे, प्रा. दादासाहेब रणदिवे, प्रा.सोनाली पटेकर, प्रा.किरण साळे व शुभम रुपनावर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.