जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात होत असलेल्या ८१ ग्रामपंचायत निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाळासाहेबाची शिवसेना ग्रामपंचायत निवडणूकीत मोठ्या संख्येने उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर जत तालुक्यात बाळासाहेबाच्या शिवसेनेकडून पुढील निवडणूका लढविण्याची तयारी सुरू आहे.नव्या दमाचे व थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेले योगेश जानकर यांच्या खाद्यावर जत तालुक्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी गेल्या महिन्यापासून जतच्या कळीच्या प्रश्नात लक्ष घातले आहे.मुख्यमंत्री दरबारी जतच्या समस्या कळवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांना जत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकातही शिंदे गटाकडून अनेक गावात पँनेल,उमेदवार उभे करण्यात येत आहेत.सातत्याने बैठका वाढल्याने शिंदे गट तालुक्यातील निवडणूका ताकतीने लढणार हे निश्चित झाले आहे.शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारीही कामाला लागले आहेत.