फॅबटेक पब्लिक स्कूलला ‘शैक्षणिक उत्कृष्टता’ पुरस्कार 

0
सांगोला: ‘अध्यापन शास्त्रीय पद्धतीमध्ये नवीनता’ या श्रेणीअंतर्गत‌ फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला शैक्षणिक पद्धतीमध्ये
श्रेणी उत्कृष्टता इनोव्हेशन अंतर्गत “ग्रीन स्कूल ऑफ द इयर २०२२” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १ डिसेंबरला चौथ्या एड्यूलीडर्स समितीमध्ये नेसको मुंबई येथे हा पुरस्कार देण्यात आला. ब्रेन वॉडर्सद्वारे समर्थित यूनिवर्सल मॅटर्स असोसिएशन ३६ जिल्ह्यातील महाराष्ट्रातील उत्कृष्ट शाळांना सन्मानित केले आहे. पायाभूत सुविधा, शैक्षणिक पद्धती ,हरित उपक्रम, अभ्यासेत्तर  आणि खेळ, अभ्यासक्रम यांच्यावर लक्ष देऊन केलेल्या अनुकरणीय कार्यावर प्रकाश टाकत, विशेष गरजांमध्ये नावीन्य आणि तंत्रज्ञानाची तयारी शाळेतील उच्च दर्जाची मानके साध्य करण्यासाठी पूर्णपणे आणि कठोर मूल्यमापन करण्यात येऊन फॅबटेक पब्लिक स्कूल अँड
ज्युनिअर कॉलेज या शाळेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करता शाळेमध्ये अध्यापनासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची
गोडी निर्माण करणे हाच मुख्य उद्देश असतो, वेगवेगळ्या प्रकारे अध्यापन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रत्येक घटक चांगल्या प्रकारे समजावा हाच मुख्य हेतू आहे. अध्यापन शास्त्रीय पद्धतीमध्ये नवीनता असल्याने प्रत्येक विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अगदी सहजतेने मिळते हेच खरे,संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर अमित
रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे यांनी शाळेचे प्राचार्य सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.