सिमाभागातील शिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध

0
7
डफळापूर,संकेत टाइम्स : शिंगणापूर (ता.जत) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.लोकनियुक्त संरपच मनीषा विठ्ठल पाटील यांच्यासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

 

गावांच्या विकासासाठी सर्व गटतट बाजूला ठेवत सर्व गटाच्या नेत्यांनी एकत्र बिनविरोधचा आदर्शवत निर्णय घेतला आहे.कर्नाटक-महाराष्ट्र सिमावाद पेटलेला असताना सीमावर्ती असणाऱ्या शांत,संयमी शिंगणापूर या गावातील नागरिकांशी घेतलेल्या निर्णयांने  तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.
आण्णासो दादासो पांढरे,अजित सखाराम पांढरे,शंकर येसू पांढरे,अलका रामचंद्र पांढरे,अनिता सुखदेव पांढरे,वर्षाराणी ज्ञानदेव कांबळे,सुवर्णा वकिल नाईक असे बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
शिंगणापूर ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्याबद्दल नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख योगेश जानकर व अन्य
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here