जत,संकेत टाइम्स : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एल के पी मल्टिस्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.डफळापूर शाखेचा लोकार्पण सोहळा गुरूवार ता.१९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केला आहे.
सोलापूर, सांगली जिल्ह्यात संस्थेने अल्पावधीत ठेवीचा १०० कोटीचा टप्पा ओंलाडला आहे.छोटे-मोठे उद्योगांना या संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून मदतीचा हातभार लावला जात आहे.या शाखेच्या माध्यमातून जत तालुक्यातील ठेवीदारांना विविध योजनाच्या माध्यमातून लाभ मिळवून देणे,त्याचबरोबर छोट्या-मोठ्या उद्योग,व्यवसायिकांना आर्थिक हातभार लावला जाणार आहे.तालुक्यातील नागरिकांनी या शाखेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन अनिल इंगवले यांनी केले आहे.