जत : कष्टकराचा सन्मान… खैराव येथे बारा तासात १७ टन तीनशे किलो ऊसतोड करणाऱ्या ऊसतोड मजूर ईश्वर सांगोलकर यांचा उसाच्या फडात जाऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी सन्मान केला.यांत्रिकीकरणाच्या युगात देखील यांत्रीकरणाला छेद देत अंग मेहनतीला वाव देत तळपत्या उन्हात कष्ट करणाऱ्या ईश्वर संगोलकर हे गेली वीस वर्षापेक्षा अधिक काळ ऊसतोड करून उदरनिर्वाह करत आहेत.
यावेळी त्यांच्याकडून ऊसतोड मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. अंग मेहनत करणाऱ्या ऊसतोड मजुरांना शासनाकडून सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करू असेही यावेळी जमदाडे यांनी आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच मारुती जमदाडे,उपसरपंच विश्वास खिलारे आदी उपस्थित होते.